सध्या मोबाईलचे स्क्रीन आणि कॉम्प्युटरचा स्क्रीन अपरिहार्य झाला आहे. मात्र या दोन स्क्रीनचा सातत्याने वापर झाल्याने दृष्टीवर परिणाम होत आहे. हे परिणाम टाळण्यासाठी काय करावे याबाबत काही डॉक्टरांनी २० कलमी कार्यक्रमच जाहीर केलेल आहे. दृष्टीचे तेज टिकवण्यासाठी ओमेगा ३ या फॅटी ऍसिडची जास्त गरज असते आणि दृष्टीवर फार ताण येताच तिला विश्रांतीही देण्याची गरज असते. या सूचनांचसह हा २० कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. डॉ. विजय भट्ट यांनी हा कार्यक्रम दिलेला आहे.
चांगल्या दृष्टीसाठी २० कलमी कार्यक्रम
आठवड्यातून किमान एक दोनदा तरी खाण्यामध्ये माशांचा समावेश करणे आणि अंडी खाणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून मिळणार्या द्रव्यांना कोवळ्या सूर्यकिरणांची साथ मिळाली तर डोळ्यांचे आरोग्य टिकते. त्याशिवाय अधूनमधून डोळे तपासणे, स्क्रीनकडे एकटक न बघणे आणि अधूनमधून पापण्या फडफडवणे स्क्रीनपासूनचे डोळ्यापर्यंतचे अंतर डोळ्यावर ताण न येईल अशा पध्दतीने ठरवणे असे उपाय या २० कलमात आहेत.
फार झगझगीत वस्तूकडे न बघणे, गॉगल वापरणे, कोरड्या हवेत न फिरणे, अधूनमधून डोळे धुणे, धूम्रपान सोडणे, सौंदर्य प्रसाधनांचा डोळ्यावर परिणाम होऊ नये याची दक्षता घेेणे, पालेभाज्या खाणे, डोक्यावर मसाज करणे, भरपूर झोपणे, गाजरासारखे बिटा कॅरोलीन द्रव्य असलेले पदार्थ खाणे हेही उपाय डॉक्टरांनी सांगितेलेेले आहेत.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही