‘फॉक्सवॅगन’च्या ५ लाख गाड्याचे रिकॉल

volkswagen
अमेरिका – अमेरिकेतून पाच लाख गाड्या परत घेण्याचा आदेश अमेरिकेने जर्मनमधील फॉक्सवॅगन कंपनीला दिला आहे. या कारमध्ये बसवण्यात आलेले प्रदुषणाबाबत माहिती देणारे यंत्र काम करत नसल्यामुळे हा आदेश ईपीएने कंपनीला दिल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होणार आहे.

हे आदेश अमेरिका पर्यावरण संरक्षण एजेन्सी (ईपीए) ने ‘क्लीन एअर अॅक्ट’नुसार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. फॉक्सवॅगनच्या गाड्यांना बसविण्यात आलेल्या या यंत्राच्या मदतीने ठरवून दिलेली प्रदूषणाची पातळी प्रयोगशाळेशिवाय तपासण्यास मदत होते. मात्र, हे यंत्रच काम करत नसल्यामुळे ईपीएने फॉक्सवॅगनला गाड्या परत नेण्याचे आदेश दिले आहेत.

ईपीएने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने २००९ ते २०१५ या कालावधीत बनविलेल्या जेटा, बीटल, ऑडी ए३ तर २०१४ ते १५ मधील पसाट या गाड्यांना अमेरिकेतून घेऊन जाण्यात सांगितले आहे. या वर्षांतील इतक्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांना माघारी घेतल्याने कंपनीला कमीत कमी १८ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

प्रवर्तन आणि अनुपालन आश्वासन कार्यालयाने अशा प्रकारच्या यंत्रांचा वापर करणे धोक्याचे असून मनुष्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगितले. या यंत्रांची तपासणी केली असता, प्रदूषण कमी दाखवते आणि सर्वसाधारणवेळी हे यंत्र बंद होते. त्यामुळे प्रदूषण पातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Leave a Comment