हिरा शोधा आणि हिर्‍याचे मालक व्हा

hire
पर्यटनासाठी लोक विविध वैशिष्ठ्यपूर्ण ठिकाणांचा आवर्जून शोध घेत असतात. अमेरिकेतील अर्कान्सास स्टेटमधील पाईन कौंटीमधील मरफेसबोरो हे असेच एक आगळेवेगळे पर्यटनस्थळ म्हणता येईल. येथे निसर्गसौंदर्य, पुरातन वास्तू,पर्यटनाची कांही खास आकर्षणे वगैरे कांही नाही तरीही येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. याचे कारण आहे येथली हिर्‍याची खाण. येथील जमिनीत अगदी उघड्यावरही सहज हिरे सापडतात आणि ज्याला हिरा सापडला तो त्याच्या मालकीचा होतो.

हा भाग नॅशनल पार्कचा हिस्सा आहे. १९०६ सालापासून येथे हिरे मिळत असल्याच्या नोंदी आहेत. पैकी ३७ एकराच्या शेतात अगदी जमिनीवच्या वरच्या भागाही हिरे सापडतात. पहिली नोंद आहे ती जमिनीचा मालक जॉन हडेलस्टोन याला ऑगस्ट १९०६ मध्ये या शेतात दोन चमकते दगड सापडल्याची. हे चमकते दगड म्हणजे हिरे होते. जॉनने मग ही जमीन एका हिरेकंपनीला विकली. १९७२ साली ही जमीन नॅशनल पार्कमध्ये समाविष्ट केली गेली. आता येथे सर्वसामान्य माणसेही जातात आणि हिर्‍याचा शोध घेतात. त्यासाठी किरकोळ प्रवेश फी भरावी लागते.

मिळालेल्या माहितीनुसार ४० कॅरेटचा अंकल सॅम हिरा येथेच सापडलेला आहे.१९७२ सालापासून आत्तापर्यंत येथे ३१ हजारांहून अधिक लहान मोठे हिरे मिळाले असल्याचे सांगितले जाते. चार ते पाच कॅरेटच्या हिर्‍याची बाजारातील किंमत हजारो डॉलर्समध्ये असते.

Leave a Comment