विंडोज आणि अॅड्राईडची मजा एकाच फोनमध्ये

vaoni
चिनी स्मार्टफोन कंपनी एलोफोनने वाऊनी नावाने नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे. या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात विंडोज टेन आणि अँड्राईड ५.० लॉलिपॉप अशा दोन ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. म्हणजे हा ड्युअल बूट स्मार्टफोन स्टार्ट अथवा रिस्टार्ट करताना दोन्हीपैकी कोणत्याही एका ओएसची निवड करता येणार आहे.

या स्मार्टफोनला ५.५ इंची एलईडी डिस्प्ले,३ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने आणखी ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. सोनी एक्समोर २३० सेंसरसह २०.७ एमपीचा ऑटोफोकस रियर कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. त्यावर ४ के व्हीडीओ शूट करता येणार आहेत. ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिट स्कॅनर, एक्स्ट्रा बॅटरी, ४ जी, थ्री जी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस,एज, मायक्रो यूएसबी सपोर्ट अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

हा स्मार्टफोन २० हजार रूपयांत मिळू शकणार असून त्याचे प्रीबुकींग १७ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. युजरला तो ३० सप्टेंबरपासून मिळू शकणार आहे. ही कंपनी अमेरिकेत फारशी माहिती नसली तरी चीनमध्ये ती शिओमीच्या तोडीची समजली जाते.

Leave a Comment