पोर्शेच्या इलेक्ट्रीक कारने माजविली खळबळ

mission-e
फ्रँकफर्ट येथे सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये पोर्शेने सादर केलेल्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक कारने खळबळ माजविली आहे. वेग असो वा किंमत सर्वच आघाड्यांवर ही कार प्रेक्षकांचे आकर्षण केंद्र बनली आहे. मिशन ई नावाने सादर केलेली ही स्पोर्टस कार ग्राहकाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन बनविली गेली आहे. रेसिग ट्रॅक, रस्ते कुठेही ही कार उत्तम परफॉर्मन्स देईल असा कंपनीचा दावा आहे.

ही इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केली की ५०० किमीचे अंतर कापू शकते. कारला ६०० एचपीचे इलेक्ट्रीक इंजिन दिले गेले आहे. ० से १०० किमीचा वेग ती ३.५ सेकंदात घेते आणि कारचा टॉप स्पीड आहे २५० किमी. या कारमध्ये चार जणांचा आरामात बसण्याची सुविधा आहे तसेच सामानासाठी दोन वेगळे कंपार्टमेंट आहेत. इंटिग्रेटेड सेंसर्सयुक्त मॅट्रीक्स एलईडी हेडलाईटस, चार दरवाजे, बाहेरच्या आरशांच्या जागी कॅमेरे दिले गेले आहेत. कॅमेर्‍यातील दृष्यांची प्रतिमा खालच्या विंडशिल्डच्या कॉर्नरवर उमटते. अनेक अत्याधुनिक उपकरणांनी ही कार सज्ज केली गेली आहे.

कारला वजनाने हलके रूंद टायर्स दिले गेले असून ते एरोरिम्सवर बसविले गेले आहेत. कारला एक्झॉस्ट सिस्टिम अथवा ट्रान्समिशन टनेल नाही. कारचे इंजिनही कॉम्पॅक्ट आहे. इंजिन ८० टक्के चार्ज करायला केवळ १५ मिनिटे पुरतात तसेच इंडक्टीव्ह चार्जिगची व्यवस्था दिली गेली आहे.

Leave a Comment