जगातील दिल्ली आणि मुंबई ही स्वस्त शहरे – अहवाल

mumbai
मुंबई : देशभरात महागाई आगडोंब भडकलेला असतानाच, स्विस बँक यूबीएसने दिल्ली आणि मुंबईरांना दिलासा देणारा अहवाल प्रसिद्ध केला असून दिल्ली आणि मुंबई ही शहरे जगभरातील शहरांच्या तुलनेत स्वस्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हा अहवाल जगभरातील ७१ शहरांचा तुलनात्मक अभ्यास करून सादर करण्यात आला असून बल्गेरियातील सोफिया, चेक प्रजासत्तकची राजधानी प्राग, रुमानियातील बुकारेस्ट आणि युक्रेनचे कीव या शहरांचा स्वस्त शहरांच्या यादीत समावेश आहे.

न्यूयॉर्क हे जगातील सर्वात महागडे शहर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर इंग्लंडची राजधानी लंडन हे महागड्या शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्कपाठोपाठ स्वित्झर्लंडमधील झुरीक आणि जिनेव्हा, नॉर्वेचं ओस्लो, लंडन आणि हाँगकाँग या शहरांचा महागड्या शहरांच्या यादीत नंबर लागतो.

Leave a Comment