हा सुपरकॉम्प्युटर सांगतो मरणाची वेळ

computer
रूग्णाचे किती आयुष्य शिल्लक आहे म्हणजेच रूग्ण जगाचा निरोप कधी घेणार आहे याचे १०० टक्के अचूक भाकित वर्तविणारा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेतील विकसकानी तयार केला असल्याचे वृत्त आहे. बोस्टनच्या बेथ इस्त्रायल डिकोन्सेस मेडिकल सेंटरमध्ये हा संगणक इंस्टॉल केला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या ३० वर्षात लक्षावधी रूग्णांशी संबंधित माहिती यात एकत्र केली गेली आहे. डॉ. स्टीव्ह हार्ग यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा रूग्ण येथे दाखल होतो तेव्हा त्याची सर्व माहिती हा संगणक मिळवू शकतो. रूग्णामध्ये जी लक्षणे दिसत आहेत त्याप्रमाणेच तशीच लक्षणे अन्य रूग्णांमध्ये पूर्वी आढळली असतील तर तो तुलना करतो आणि भविष्यात या रूग्णावर कसे उपचार होणार याचीही माहिती देतो. या संगणकात प्रथमच बिग डेटा सिद्धांताचा वापर केला गेला आहे.

हा संगणक दर तिसर्‍या मिनिटाला रूग्णाच्या ऑक्सिजन लेव्हल, ब्लड प्रेशर यांच्या नोंदी घेतो. यामुळे डॉक्टरांची रूग्णांना हाताळण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर हा संगणक रूग्ण अजून किती दिवसांचा सोबती आहे हेही सुचवितो. संगणकाने रूग्ण जगण्याची शक्यता नसल्याचे सुचविले असेल तर पुढील ३० दिवसांत रूग्णाचा मृत्यू नक्की समजला जातो.

Leave a Comment