आयुर्वेदिक पद्धतीने करणार रामदेव बाबा डेंग्यूचा उपचार

ramdev-baba
नवी दिल्ली- डेंग्युची साथ देशाच्या राजधानी दिल्लीत पसरलेली असताना आयुर्वेदिक पद्धतीने या रोगाचा सामना करण्याचे आवाहन रामदेव बाबांनी केले आहे. अॅलोपॅथीने डेंग्युचा प्रतिकार होत नाही तेव्हा आयुर्वेदिक उपचार वापरून पाहा यामुळे डेंग्यू बरा होतो असे रामदेव बाबांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

कोरफड, गुळवेल, पपईची पाने आणि डाळिंबाचा रस यांचे दिवसातून तीन ते चार वेळा सेवन केल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो असा दावा रामदेव बाबांनी केला आहे. हे मिश्रण पिल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढते असे त्यांनी म्हटले आहे. डेंग्यूशी लढण्यात दिल्ली सरकारला अपयश आले आहे आणि अॅलोपॅथीमध्ये डेंग्यूवर उपचार नाही म्हणून आयुर्वेदच पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment