आता एड्सग्रस्तांवर होणार प्रभावी नैसर्गिक उपचार !

hiv
न्यूयॉर्क – अतिभंयकर असलेल्या एड्स या रोगावर उपाय शोधण्यासाठी जगभरात संशोधन केले जात असून या रोगावर उपचारासाठी अनेकांनी उपाय शोधल्याचा दावा केला आहे. अशाच अमेरिकेतील मिशिगेन विद्यापीठातील संशोधकाच्या एका पथकाने एड्सच्या उपचारासाठी नैसर्गिक प्रभावी उपाय शोधल्याचा दावा केला आहे.

ईआर मॅनल (ERManl) हे प्रोटीन या पथकाने विकसित केले असून, एड्सला हेच प्रोटीन प्रतिबंध घालणार असल्याचे या पथकाने जैव रसायनच्या जर्नलमधून म्हटले आहे. इतर उपचारामुळे जंतू पसरतच राहतात. मात्र, या प्रोटीनमुळे एड्सग्रस्तांमध्ये जंतू पसरत नाहीत, तो पूर्णपणे जंतूंना रोखू शकतो. त्यामुळे ईआर मॅनल (ERManl) हे प्रोटीन फायदेशीर ठरणार आहे, असे या जर्नलेचे लेखक योंग-हुई झेंग यांनी म्हटले आहे.

एका प्रयोगात या पथकाने एड्सग्रस्ताची तपासणी केली. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्यावर ईआर मॅनल (ERManl) हे प्रोटीनद्वारे उपचार करण्यात आला. त्यानंतर हा एड्सग्रस्त बरा झाला असे ही या पथकाचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment