फ्रॅकफर्ट येथे सध्या सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ऑटो शो मध्ये एका छोट्याश्या क्यूट कारने समस्त प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आकर्षक कारचे नांव फोर्टवो कॅब्रियो असे असून त्याचा अर्थ आहे अशी कार जिचे छत उघडू शकते. या कारने इतकी धूम माजविली आहे की शोला भेट देणारे प्रेक्षक वारंवार वळून तिच्याकडे पाहण्याचा मोह आवरू शकत नसल्याचे सांगितले जात आहे.
नन्हीसी क्यूटी फोर्टवो कॅब्रियो ऑटो शोत झळकली
दिसायलाच इतकी क्यूट मग चालवायची मजा कांही औरच असणार अशी खात्री प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. या कारचे छत कांही सेकंदात उघडता येते तसेच मिटताही येते. कारचे इंटिरियरही धमाल आहे. ते खेळण्यातल्या कारसारखे वाटले तरी अत्याधुनिक फिचर्सनी परिपूर्ण आहे. दोन लोकांसाठी पुरेशी जागा शिवाय सामानासाठी मागच्या बाजूला जागा आहे. म्हणजे दोघात तिसर्याची अडचण होऊच शकत नाही अशीच तिची बांधणी आहे. आकर्षणाचे केंद्र बनलेल्या या कारसुंदरीच्या किमतीबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.