सॅमसंगचा फोल्डेबल स्क्रीन स्मार्टफोन येणार

samsung
सॅमसंगने फोल्डेबल स्क्रिनचा प्लॅस्टीक स्मार्टफोन या वर्ष्रअखेर बाजारात आणले जात असल्याचे संकेत दिले आहेत. जानेवारी २०१६ मध्ये हा फोन विक्रीसाठी बाजारात दाखल होईल असेही सांगितले जात आहे. चीनमध्ये या फोनसंबंधातील अंतिम चाचण्या सुरू आहेत आणि प्रोजेक्ट व्हॅली असे याचे कोडनेम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या फोनसाठी दोन हार्डवेअरवर टेस्टींग सुरू आहे. एक स्नॅपड्रॅगन ६२० प्रोसेसर तर दुसरे स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर या हार्डवेअरचा त्यासाठी वापर केला जात आहे. फोनसाठी ३ जीबी रॅम, मायक्रो एसडी, नॉन रिमुव्हेबल बॅटरी असेल. फोल्डेबल स्क्रीनचा सर्वाधिक फायदा ज्यांना फोन हातातून पडल्यामुळे स्क्रीन तुटण्याची भीती वाटते अशा युजरना होणार आहे. हा फोन हातातून पडला तरी कोणत्याही कोनात फोल्ड होऊ शकतो व त्यामुळे स्क्रीन फुटण्याची भीती राहात नाही. तसेच फोल्ड होत असल्याने तो सहज खिशात ठेवता येतो आणि गरजेनुसार स्क्रीन मोठा करता येतो.

अर्थात फोल्डेबल स्क्रिन बनविण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी मायक्रोसॉफ्टनेही त्यांच्या टॅब्लेटसाठी असा स्क्रीन बनविला होता मात्र हा टॅब्लेट रिलीज झाला नाही.

Leave a Comment