गुगलने दिला एम. एफ. हुसेन यांच्या शंभरीनिमित्त आठवणींना उजाळा

doddle
मुंबई – आज प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचा १०० वा वाढदिवस आहे. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी कला क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांचा १०० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हुसेन यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त गुगलनेही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गुगलने आज एम. एफ. हुसेन यांच्यावरचे गुगल डूडल त्यांच्य़ा पेजवर लावले आहे. आज दिवसभर गुगलवर भेट देण्याऱ्या सर्वांना त्यामुळे हुसेन यांची आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. या जगप्रसिद्ध चित्रकारचे डूडल लावत गुगलने त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे १७ सप्टेंबर १९१५मध्ये हुसेन यांचा जन्म झाला होता. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. हुसेन हे प्रोग्रेसिव आर्टस ग्रुप ऑफ बॉम्बेचे संस्थापकही होते.

Leave a Comment