आता गर्भनिरोधक इंजेक्शन

injection
नवी दिल्ली : प्रेगनन्सी रोखण्यासाठी आता गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्यामुळे लवकरच ते उपलब्ध होऊ शकते. आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला होता. केंद्राने हिरवा कंदील दाखविल्याने याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

देशातील औषध क्षेत्रातील प्रमुख सल्लागार समितीने डीएमपीएच्या वापरास मंजुरी दिली आहे. याबरोबरच या समितीने केंद्र सरकारला कुटुंब नियोजन कार्यक्रमात त्याचा वापर करण्याची शिफारसही केली आहे. त्याला हिरवा कंदील दाखविल्याने त्यामुळे गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. या शिफारशीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अगोदरच सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यासंदर्भात माहिती देताना एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, या शिफारशीला आम्ही सिद्धांतिक पातळीवर मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या कुटुंब नियोजन स्तरावर हा कार्यक्रम लागू करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. डियॉक्सी मेड्रोक्सी प्रोजेस्ट्रोन एसिटेट (डीएमपीए) इंजक्शनच्या माध्यमातून देण्यात येणा-या औषधांमुळे किमान तीन महिने प्रेगनन्सी रोखू शकते. हे इंजक्शन हातावर किंवा वक्षस्थळावर दिले जाऊ शकते.

आरोग्य मंत्रालय गेल्या १० वर्षांपासून महिलांच्या गर्भनिरोधक साधनांच्या विस्तारावर विचार करीत आहे. मात्र, महिला हक्कासाठी काम करणारे कार्यकर्ते संघटनांच्या विरोधामुळे यात इंजेक्शनचा समावेश करण्याचा फैसला होऊ शकत नाही. महिला हक्कासाठी संघर्ष करणा-या संघटनांच्या मते या इंजेक्शनचा वापर केल्यास महिलांच्या मासिक धर्मावर परिणाम होऊ शकतो. अर्थात, त्यात अनियमितता येऊ शकते. एवढेच नव्हे, तर महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर त्याचा सातत्याने वापर केल्यास स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचाही धोका उद्भवू शकतो, असे महिला संघटना आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment