१ रूपयाच्या नाण्याची ३ लाख रूपयांत खरेदी

nane
जुनी आणि वैशिष्ठ्यपूर्ण नाणी जमविण्याचा अनेकांना छंद असतो आणि ही मंडळी जुन्या नाण्यांसाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. आंध्रात तेलगु कॉन्फरन्स सुरू असताना तेथे लावलेल्या स्टॉलवर १ रूपयाचे जुने नाणे म्हणजे १९७३ सालचे नाणे चक्क ३ लाख रूपयांना विकले गेले आहे. १९७३ साली मुंबई टांकसाळीत हे नाणे पाडले गेले होते. ही टांकसाळ देशातील जुन्या टांकसाळीपैकी एक असून ती ब्रिटीशानी सुरू केली होती. या टांकसाळीतील नाण्यांवर डायमंड शेपचा डॉट दिलेला असतो.

नाण्याचे संग्राहक व गेली २४ वर्षे जुनी नाणी विक्रीचा व्यवसाय करत असलेले बी. चंद्रशेखर यांच्या संग्रहातील हे नाणे आहे. ते दरवर्षी तेलगू कॉन्फरन्ससमोर आपला स्टॉल लावतात. त्यांच्याकडे अनेक जुनी नाणी आहेत. ६५ वर्षांपूर्वींची कांही ऐतिहासिक नाणीही त्यांच्याकडे आहेत.यापूर्वीही त्यांनी १ रूपयाचे नाणे २ लाखांना विकले आहे. या नाण्यावर इंदिरा गांधी यांची प्रतिमा होती.

कोलकाता टांकसाळीत पाडली गेलेली २ आणे व ५० पैशांच्या नाण्यांचीही चंद्रशेखर यांनी अनुक्रमे ७० हजार व ६० हजार रूपयांना विक्री केली आहे. देशविदेशातून चंद्रशेखर यांच्याकडे नाणी खरेदीसाठी संग्राहक येतात. त्यांच्या संग्रहात कोलकाता, मुंबई, नोएडा व हैद्राबाद या चारही टांकसाळीत पाडली गेलेली नाणी समाविष्ट आहेत.

2 thoughts on “१ रूपयाच्या नाण्याची ३ लाख रूपयांत खरेदी”

  1. जुनि नानी किंवा नोटा खरेदी करणाऱ्या ग्राहकां चेमोबाइल नम्बर किंवा पत्ता पाठवा

Leave a Comment