लेक्ससच्या कार्स लग्झरी कार प्रेमींसाठी नेहमीच पहिली पसंती राहिलेल्या आहेत. त्यातच आता लेक्ससने त्यांची एलएक्स ५७० एसयूंव्ही बाजारात सादर केली आहे. ही एसयव्ही केवळ आकर्षकच आहे असे नाही तर लेक्ससच्या बाजारात असलेल्या कारमध्ये सर्वाधिक महागडीही आहे. ही एसयूव्ही भारतात डिसेंबर मध्ये येईल असे सांगितले जात आहे आणि तिची किंमत असेल ८५ लाख ते १ कोटी रूपये.
लेक्ससची एलएक्स ५७० एक्सयूव्ही सादर
एलएक्स ५७० परफेक्ट एसयूव्ही आहे. हायवे, खडबडीत रस्त्यांवर कुठेही ती प्रवाशांना आरामदायीच ठरणार असा कंपनीचा दावा आहे. गाडीला डीओएचसी ३२ व्हॉल्व्ह व्हि ८ इंजिन बसविले गेले आहे. सामानासाठी मुबलक जागा आहे आणि गाडीचे इंटिरियरही मस्त आहे. मनोरंजनासाठी इंफोटेनमेंट सिस्टीम असून मागील सीटवर बसणार्यांसाठीही मनोरंजनाची खास व्यवस्था केली गेली आहे. गाडीला ६ स्पीड ऑटोट्रान्समिशन व मॅन्युअल शिफ्टिंग मोड दोन्हीही दिले गेले आहेत. या गाडीतून सात लोक आरामात प्रवास करू शकतात