भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी आयबॉलने त्यांचा नवा फाइव्ह यू प्लॅटिनो हा बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. फोनची किमत आहे फक्त ४५९९ रूपये. हा फोन ड्युअल सिम सपोर्ट करतो.
आयबॉल अँडीचा फाईव्ह यू प्लॅटिनो स्मार्टफोन
या फोनसाठी ५ इंची डिस्प्ले, अँड्राईड ४.४ किटकॅट ओएस, ५१२ एमबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी स्लॉटने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ८ एमपीचा रियर तर ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. थ्रीजी, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीआरएस अशी कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन मल्टी लँग्वेज सपोर्ट सिस्टीमवाला फोन असून २१ भारतीय भाषा त्यावर लिहिता आणि वाचता येतात. कमी किमतीत चांगली फिचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने या स्मार्टफोनमध्ये केला असल्याचेही सांगितले जात आहे.