व्यवसाय सहजता इंडेक्समध्ये गुजराथ अव्वल

gujrat
जागतिक बँकेने यंदाच्या वर्षीसाठी जाहीर केलेल्या व्यवसाय सहजता इंडेक्सच्या जगभरातील देश व राज्यांच्या यादीत भारतात गुजराथ राज्याने अव्वल क्रमांक मिळविला आहे. इतकेच नव्हे तर भारतातील राज्यांच्या यादीत सहा राज्ये भाजप शासित आहेत. भारतातील १० टॉप राज्यांची यादी जागतिक बँकेने या इंडेक्सखाली जाहीर केली आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारताचा क्रमांक मात्र खाली असून या यादीतील १८९ देशांच्या यादीत भारत १४२ व्या क्रमांकावर आहे. अर्थात या वर्षात मोदी सरकारने भारतात व्यवसाय व गुंतवणुकीसाठी केलेले प्रयत्न पाहता पुढील वर्षी भारताचा या यादीतील क्रमांक वर चढलेला दिसेल असेही सांगितले जात आहे.

जागतिक बँक दरवर्षी असा इंडेक्स सादर करते. त्यात यादीत वरच्या क्रमांकावर असलेले देश अथवा राज्ये व्यवसायासाठी चांगली व सुरक्षित समजली जातात कारण येथे व्यवसायासाठीचे नियम सहजसुलभ असतात. भारतात गुजराथने या बाबत आघाडी घेतली आहे. गुजराथच्या मुख्यमंत्री आहेत आनंदीबेन पटेल. दोन नंबरवर आंध्र असून मुख्यंमत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम केंद्रात युती सरकारात सामील आहे. तीन नंबरवर झारखंड असून मुख्यमंत्री आहेत भाजपचे रघुवरदास. छत्तीसगड चार नंबरवर आहे आणि येथेही भाजपचे रमणसिग मुख्यमंत्री आहेत. त्यापाठोपाठ मध्यप्रदेशचा क्रमांक आहे. भाजपचे शिवराजसिंग चौहान येथे सत्तेवर आहेत.

सहा नंबरवर राजस्थान आहे आणि येथे मुख्यमंत्री आहेत वसुंधराराजे. सातव्या स्थानावर ओडिशा असून मुख्यंमत्री आहेत नवीन पटनायक. महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे. येथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यापाठोपाठ नवव्या क्रमांकावर कर्नाटक आहे मात्र येथे काँग्रेसचे राज्य आहे तर १० व्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून येथे समाजवादीचे अखिलेश यादव मुख्यंमत्री आहेत.

Leave a Comment