स्मार्टवॉच वापरत आहात तर जरा जपून

smartwatch
नवी दिल्ली – आजच्या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या स्मार्टवॉचला हॅकिंगचा धोका असल्याची धक्कादायक बाब अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार प्रकाशात आली आहे. ही बाब इलिनॉय विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या हे सर्वेक्षणात उघड झाली आहे.

स्मार्टवॉच हे वेगवेगळे सेन्सॉर वापरून हृदयाचे ठोके अशा प्रकारची आपल्या शरीरातील इतर संबधित माहिती जतन करण्याचे काम करते. हे स्मार्टवॉच घालून उपभोगता किबोर्डवर काय टाईप करत आहे याची पूर्ण माहिती स्मार्टवॉचमुळे हॅकर्सला कळू शकते. त्याचा गैरफायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे स्मार्टवॉच वापरताना जरा जपूनच वापरण्याचा सल्ला संशोधकांनी दिला असून, शक्यतो स्मार्टवॉच घालून लॅपटॉप किंवा कम्प्युटर हाताळणे टाळावे.

Leave a Comment