सोनीचा एक्सपिरीया एम फाईव्ह ड्युअल खास सेल्फीप्रेमींसाठी

sony
सोनीने सेल्फी लव्हर्सना प्रेमात पाडेल असा एक्सपिरीया एम फाईव्ह ड्युअल स्मार्टफोन लाँच केला आहे. काळा, ग्रे, पांढरा व गोल्ड अशा चार रंगात सादर केलेल्या या फोनची किमत आहे ३७९९० रूपये

या स्मार्टफोनसाठी अँड्राईड लॉलीपॉप ५.० ओएस, ५ इंची फुल एचडी स्क्रीन, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने २०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला २१.५ एमपीचा रियर व १३एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फ्रंट कॅमेर्‍यासाठी एक्समोर आरएस सेन्सर, हायब्रिड ऑटोफोकस एफ/ २.२ लेन्स दिले गेले आहे तर रियर कॅमेर्‍यासाठी ५ एक्स झूम, ४ के व्हिडीओ रेकॉडिंग, ऑटोसीन रेकग्नीझेशन, इमेज स्टॅबिलायझर अशी फिचर्स आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, यूएसबी अशी अनेक ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment