टॅट्यूचा बादशहा हरप्रसाद उर्फ ऋषी

harprakash
टॅट्यू म्हणजे अंगावर गोंदविण्याचा प्रकार आजकालच्या युवापिढीत खूपच लोकप्रिय झाला आहे. अर्थात टॅट्यू फक्त युवापिढीचीच मक्तेदारी नाही बरंका ! कारण टॅट्यूचे गिनीज रेकॉर्ड पहायचे असेल तर त्यात अंगावर सर्वाधिक टॅट्यू असलेली व्यक्ती चक्क भारतीय आहे आणि हरप्रसाद उर्फ ऋषी नावाचे हे गृहस्थ चक्क ७४ वर्षांचे आहेत. अजूनही टॅट्यू काढून घेण्याची त्यांची हौस संपलेली नाही. गिनीजच्या २०१६ च्या रेकार्ड बुकमध्ये हरप्रसाद यांच्या नावाची नोंद घेतली जाणार आहे.

हरप्रसाद यांनी अंगभर टॅट्यू काढून घेतले आहेत. त्यात पोटावर काढलेला मोदींचा टॅट्यू पाहण्यासाठी खूप लोक येतात. हरप्रसाद यांनी अंगावर जगातील १८५ देशांचे झेंडे गोंदवून घेतले आहेत तसेच ३६६ प्रकारचे विविध टॅट्यू आहेत. यात भारतापासून जपानपर्यंतचे विविध फोटो आणि मोदींपासून ओबामांपर्यंत अनेक व्यक्तींचा समावेश आहे. गिनीज बुकने त्यांचा गोल्ड मेडलने सन्मान केला आहे. २००९ ते २०११ या काळात हरप्रसाद यांनी हे टॅट्यू काढून घेतले आहेत.