नवी दिल्ली – आयकर खात्याने प्रामाणिकपणे कर भरणार्या करदात्यांना आयकर परताव्याची रक्कम अवघ्या ७ ते १० दिवसांतच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे करदात्यांसाठी ही आनंदाची बातमीच आहे.
आयकर परतावा मिळणार १० दिवसांत
आयकर खात्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात कर वसूल होत असल्याने वाढ झाली असून ‘आधार’ कार्डवर आधारित आयटीआर सत्यापन योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्राने दिली. आयकर परतावा अर्थात आयकर रिटर्नची सत्यता आधार कार्ड किंवा बँक खात्यातील माहितीच्या आधारे करण्याच्या नव्या उपक्रमामुळे रिटर्न फाईल करणार्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आयकर परतावा अवघ्या १५ दिवसांतच करदात्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास कर विभागाला यश आले. आता हा कालावधी ७ ते १० दिवसांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.