दिवाळीत यंदा चिनी फटाक्यांवर संक्रांत

crackers
यंदाच्या दिवाळीत भारतीय बाजारात चिनी फटक्यांचा बार फुसका निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा चिनी फटके आयातीस परवानगी दिली गेली नसून अशी आयात ही अवैध मानली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात पीएमके नेते अंबुमणी रामदास यांनी वाणिज्य मंत्रालयाला चिनी फटाके आयात व विक्रीवर बंदी घालण्यासंदर्भातला विनंती अर्ज दिला होता असेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार देशात चिनी फटाके आयात केले जाणार नाहीत हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली गेली आहे. आयात बंदी असतानाही जे व्यापारी चिनी फटाके आयात करतील अथवा विक्री करताना आढळतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेशही राज्य सरकारांना दिले गेले आहेत. चिनी फटाकयांमुळे भारतीय फटाका क्षेत्रात काम करणार्‍या सुमारे ९० लाखांहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. कारण चिनी फटाके अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने महाग भारतीय फटाक्यांना मागणी नाही असे दिसून आले आहे.

Leave a Comment