एकांतातले गांव हवासुपाई

havsupai
अमेरिकेतील अॅरिझोना प्रांतातील ग्रँड कॅनियन येथे जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात हे खरे असले तरी याच भागात एक गांव असेही आहे, जेथे जाण्यासाठी आजही रस्ता नाही. येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टर अथवा खच्चरचाच उपयोग करावा लागतो अन्यथा भला मोठा पहाड पायी चढूनच येथे जावे लागते. यामुळे अनेकांना हे गांव अद्यापीही अज्ञातच राहिले आहे. हवासुपाई असे या भागाचे नांव आहे.

सुपाई इंडियन व्हिलेज असेही त्याला म्हटले जाते. येथे हवासुपाई नावाचे आदिवासी राहतात आणि गेली ८०० वर्षे त्यांचे येथे वास्तव्य आहे. ग्रँड कॅनीयनच्या तळात वसलेल्या या छोट्याशा गावाला कॅटरॅक्ट कॅनियन असेही म्हणले जाते. म्हणजे डोळ्यातील मोतीबींदू प्रमाणे वसलेले गांव. या गावापासून सगळ्यात जवळचा रस्ता १३ किमी दूर आहे. येथे कार अथवा अन्य रस्ता वाहने येऊ शकत नाहीत. फक्त हेलिकॉप्टर्स येतात अथवा घोड्यांवरून येता येते. आजही येथे टपाल खच्चराच्या पाठीवरूनच आणले जाते.

या गावाची लोकसंख्या आहे अवघी ६००. हवासुपाई या नावाचा अर्थ आहे हिरवे नीळे पाणी. येथील नदीतील पाणी धबधब्याच्या रूपाने हवाय कॅनियनमधून कोलोराडो नदीत जाते. केवळ या पाण्याचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि एकांतवासाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे येतात असेही सांगितले जाते मात्र त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असते.

Leave a Comment