आजच्या तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाचे महत्त्व वेळीच ओळखून सॅमसंगने ६ जीबी रॅम असलेले स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या दृष्टीने कामास सुरवात केली असल्याचे जाहीर केले आहे. लवकरच ६ जीबी रॅमचे स्मार्टफोन बाजारात दाखल होतील असे कंपनीतील सूत्रांकडून सांगितले गेले आहे. ही रॅम २० एनएम टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.
सॅमसंग आणणार ६ जीबी रॅमवाले स्मार्टफोन
सध्या बाजारात फोर जीबी रॅमपर्यंतचा वापर स्मार्टफोनमध्ये होत आहे. हे फोनही अतिशय वेगवान आणि पॉवरफुल आहेत. मात्र ६ जीबी रॅम आल्यानंतर स्मार्टफोनचा वेग आणखी वाढणार आहे. हे फोन सध्याच्या स्मार्टफोनच्या तुलनेत किमान ३० टक्के अधिक वेगवान असतीलच पण ते २० टक्के कमी पॉवर वापरण्यासही सक्षम असतील असे समजते.