श्रीलंकेत इंडिया एक्स्पोची सुरवात

shrilanka
श्रीलंकेत आजपासून म्हणजे १२ सप्टेंबरपासून इंडिया एक्स्पोची सुरवात झाली असून हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. यात ५० हून अधिक भारतीय कंपन्या सहभागी झाल्या आहेत. श्रीलंकेत व्यवसायविस्तार संधी मिळण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होणार असल्याचे भारतीय निर्यात संघटनांतर्फे सांगितले गेले आहे. भारतीय उच्चायोगाच्या सहकार्याने निर्यात संघटनांनी हे प्रदर्शन भरविले आहे.

एफआयइओचे अध्यक्ष ए.शक्तीवेल या संदर्भात म्हणाले, या एक्स्पोमध्ये कपड्यांपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंपर्यंत तसेच इलेक्ट्रीक इलेक्ट्रोनिक पासून फार्मा कंपन्यांपर्यंत विविध क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत. श्रीलंका भारतीय उद्योजकांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेत व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधही सलोख्याचे आहेत. श्रीलंकेतील स्थानिक उद्योगांच्या सहकार्याने भारतीय उद्योजक श्रीलंकेत व्यवसायविस्ताराच्या संधी अजमावून पाहात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment