आजपासून बँकांमध्ये सुटीचा शनिवार!

bank
मुंबई – शनिवार, १३ सप्टेंबर म्हणजेच आजपासून बँक कर्मचाऱ्यांना महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी देण्याची अंमलबजावणी सुरू होत असून महिन्यातील उर्वरित शनिवारी सार्वजनिक तसेच खासगी बँकांमध्येही आता पूर्ण दिवस कामकाज चालेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रलंबित वेतनवाढीच्या कराराबरोबरच बँक कर्मचाऱ्यांच्या अन्य सरकारी उपक्रमांप्रमाणे दुसऱ्या व चौथ्या सुटीबाबतच्या मागण्याही मान्य करण्यात आली.

केंद्रीय अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाने गेल्या महिन्यात सप्टेंबरपासून तिच्या अंमलबजावणीची अधिसूचना काढली. तथापि महिन्यातील अन्य शनिवारी बँकांच्या शाखेत अन्य दिवसाप्रमाणे पूर्ण दिवसाचे कामकाज होईल. तर आरटीजीएस, एनईएफटीद्वारे निधी हस्तांतरणाचे तसेच धनादेश वटणावळीचे व्यवहार आता या दिवशी होतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment