अॅपलचे नवे आयफोन भारतात आक्टोबरच्या मध्यात उपलब्ध होतील असा अंदाज वर्तविला जात असताना मुंबई, दिल्ली व कोलकाताच्या ग्रे मार्केटमध्ये हे फोन या महिनाअखेरीच उपलब्ध होऊ शकणार आहेत. फक्त त्यासाठी ग्राहकाला किमान १ लाख रूपये मोजावे लागतील असे येथील व्यवसायिक सांगत आहेत. मुंबईतील हिरापन्ना, कॉफर्ड मार्केट तसेच दिल्लीतील गप्फार मार्केट व कोलकाता येथील एअरकंडिशन मार्केट आणि फॅन्सी मार्केटमध्ये ग्राहक नव्या आयफोनची मोठ्या प्रमाणावर चौकशी करत असल्याचेही सांगितले जात आहे.
नवा आयफोन हवाय? १ लाख रूपये मोजा
बुधवारी रात्री अॅपलने त्यांचे नवीन आयफोन एस सिक्स व एस सिक्स प्लस न्यूयॉर्कमध्ये सादर कले आहेत.या फोनसाठीची प्रीबुकींग १२ सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरू होत आहे मात्र प्रत्यक्षात अॅपल स्टोअर्समध्ये हे फोन २५ सप्टेंबरपर्यंत येणार आहेत. नव्या फोनमध्ये रोझ गोल्ड व्हेरिएंटसाठी मोठी मागणी आहे. सध्या ग्रे मार्केट व्यावसायिकही प्रीबुकींग घेऊ लागले आहेत. हिरापन्ना व गफ्फार मार्केटमधील व्यापार्यांकडून समजलेल्या माहितीनुसार आमच्याकडे ज्या प्रमाणात मागणी येते आहे त्या प्रमाणात आम्ही अमेरिकेतील आमच्या एजंटमार्फत आयफोनसाठी प्रीबुकींग करत आहोत. अमेरिकेत २५ सप्टेंबरपासून हे फोन ग्राहकांना मिळतील तर भारतात ग्रे मार्केटमधून ते त्यानंतर दोनतीन दिवसांत मिळतील.
आक्टोबरमध्ये एस सिक्स व प्लस भारतात येतील असा अंदाज आहे. तो पर्यंत हे फोन ग्रे मार्केटमध्ये ८० हजार ते १ लाख रूपयांच्या दरम्यान मिळतील. एकदा भारतात ते उपलब्ध झाले की त्यांच्या किमती घसरून त्या ६५ ते ७० हजारांपासून सुरू होतील. मात्र त्यातही रोझ गोल्डच्या किमती कमी होणार नाहीत कारण या फोनचा पुरवठा कमी आहे आणि त्याला मागणी अधिक आहे. अमेरिकेपाठोपाठ सिंगापूर आणि हाँगकाँगमधूनही हे फोन भारतीय ग्रे मार्केटमध्ये येणार असल्याचेही सांगितले जात आहे.