जेम्स बॉण्ड म्हटले की त्याच्या अनेक प्रकारच्या चमत्कारीक कार आपल्या नजरेसमोर येतात मात्र त्यातही ऑस्टन मार्टिन प्रथम नजरेसमेार येते. कंपनीने जेम्स बॉण्ड ऑस्टन मार्टिन डीबी ९ एडिशनच्या १५० कार म्हणजेच लिमिटेड एडिशन कार बाजारात आणण्यात येत असल्याचे जाहीर केले असून तुमचा खिसा जड असेल तर ही कार तुम्हीही खरेदी करू शकणार आहात. त्यासाठी फक्त आपला खिसा १ कोटी ६० लाख रूपयांनी हलका करावा लागणार आहे.
आपणही घेऊ शकता जेम्सबॉण्ड ऑस्टन मार्टिन डीबी ९ कार
जेम्सबॉण्ड प्रमाणेच ऑस्टीनचे मालक असणे ही ग्राहकाला फारच अभिमानाची गोष्ट वाटेल असाही कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये अक्सेसरीज व अंतर्गत सजावट जेम्स बॉण्डपासून प्रेरणा घेऊनच केली गेली आहे. युनिक नंबर सिल प्लेकमध्ये ००७ लोगो,गन बॅरल डिझाईन, २० इंची टेनस्पोक ब्लॅक डायमंड अॅलॉय व्हील्स, स्पेशल बॉण्ड एडिशन स्टार्टअप स्क्रीन तुम्हाला स्वतःच गुप्तहेर असल्याचा फिल देईल. कारला ६.० लिटर व्ही १२ इंजिन दिले गेले आहे. त्यामुळे कार ४.५सेकंदात १००किमीच्या स्पीड पकडू शकते आणि कारचा टॉप स्पीड आहे २९५किमी.
कारला डबल सस्पेन्शन दिल्याने कार ड्रायव्हिंगचा अनुभव एकदम मस्त आहे.अॅडाप्टिव्ह डंपिग सिस्टम एडीएस मुळे नॉर्मल, स्पोर्ट व ट्रॅक मोडवर चालविण्यास मदत मिळते. कारसोबत खास बॉण्ड अॅकसेसरीजही दिल्या जाणार असून त्यात ओमेगाची सीमास्टर अक्वाडेट १५० एम जेम्सबॉण्ड लिमिटेड एडिशनच्या गड्याळाचाही समावेश आहे.