दक्षिण आफ्रिकेत गुहेमध्ये सापडले प्राचीन मानवी अवशेष

south-africa
जोहान्सबर्ग : मानवाच्या हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष दक्षिण आफ्रिकेतील एका गुहेमध्ये सापडले असून मात्र, हे अवशेष प्राण्याचे आहेत की मानवाचे याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. जोपर्यंत याचे अधिक संशोधन होत नाही तोपर्यंत मानवी उत्क्रांतीबाबत काहीही बोलता येणार नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी गुहेमध्ये सापडलेले अवशेष हे प्राचीन मानवाचे असल्याचे दावा केला आहे. मानवी चेहऱ्याशी किंचित मिळतेजुळते हे अवशेष आहेत. तर काहींनी प्राण्याचे असल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी या प्राण्याला सध्या ‘नाह लेह डी’ असे नाव देण्यात आले आहे.

ही गुहा जोहान्सबर्गपासून तीस मैल अंतरावर आहे. याच गुहेत संशोधकांना हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडले आहेत. १५ संशोधकांना मानवी हाडांचे व इतर अवयवांचे १,५५० नमुने सापडले आहेत, तसा त्यांनी दावा केला आहे. या संशोधन पथकातील प्रमुख आणि जोहान्सबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक ली बर्गर यांनी सांगितले, हाडांच्या सापळ्यावरून असे दिसते की, याचे वय लाखो वर्षांपूर्वीचे आहे. मात्र, याचे निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे.

सापडलेल्या अवशेषांवर आणखी संशोधन सुरू आहे. संशोधकांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत या प्राचीन अवशेषांबाबत अधिकृत घोषणा केली, तर शोधपत्रिका ई-लाईफमध्येही नव्या संशोधनावर भाष्य करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. गुहेच्या दुर्गम भागात हा प्राणी कसा गेला यावरही तर्कवितर्क मांडले जात आहेत. मृत्यूनंतर या प्राण्याचे अवशेष येथे ठेवले गेले असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment