नासाचा यांत्रिक बाहू बनवण्यासाठी प्रकल्प

nasa
वाशिंग्टन : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा या अमेरिकी संस्थेने स्टार ट्रेक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवकाशात काम करू शकणारा विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहू तयार करण्याच्या प्रकल्पात एका अमेरिकी कंपनीशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

अवकाशातील कुठलीही वस्तू हा बाहू पकडू शकेल, त्यात उपग्रहही पकडता येतील, उपग्रह किंवा अवकाश कचरा चक्क उचलून दूर करण्याचा मार्गही त्यात उपलब्ध असेल. नासाने त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅक्र्स पॅक्स कंपनीशी करार केला असून त्या अंतर्गत बॅक टू फ्युचर चित्रपटातील मार्टी मॅकफ्लायच्या तरंगणारा स्केटिंगबोर्ड तयार केला जाईल. त्यात विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर केला जाणार आहे. यात हेंडो ओव्हरबोर्ड वापरला असून त्यावर काही इंजिनांच्या मदतीने विरुद्ध बाजूने चुंबकीय क्षेत्र खालून लावले जाते, त्यामुळे तो बोर्ड उंच उचलला जातो. त्या प्रमाणे आता नवीन यांत्रिक बाहूत म्हणजे मॅग्नेटिक टेथरिंग डिव्हाइसमध्ये क्युबसॅटसारखे लहान उपग्रह पकडता येतील, ते एका रांगेत लावता येतील त्यांची माहिती गोळा करण्याची क्षमता वाढवता येईल, याबाबत आम्ही

आशावादी असून सर्व शक्यता तपासल्या जातील, असे नासाच्या व्हर्जिनियातील लँगले रीसर्च सेंटरचे ल्यूक मर्चिसन यांनी म्हटले आहे. आमचे सहकार्य अक्र्स पॅक्स कंपनीशी राहील असे कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग हेंडरसन यांनी म्हटले आहे. नासासारख्या नामवंत संस्थेच्या बुद्धिमान वैज्ञानिक व अभियंत्यांबरोबर काम करण्यात आम्हाला आनंदच आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment