अॅपलचे आयफोन सिक्स एस व प्लस आले

iphone
अॅपलने बुधवारी रात्री उशीरा या वर्षीच्या मेगा इव्हेंटमध्ये आयपॅड प्रोसह आयफोन सिक्स एस व सिक्स एस प्लस लाँच केले आहेत. या इव्हेंटमध्ये अॅपलने अनेक नवीन प्रॉडक्ट सादर केले आहेत. त्यात आयपॅड प्रो, अॅपल टिव्ही प्रमुख आहेत.

बहुप्रतिक्षित आयफोन सिक्स एस व सिक्स एक प्लस गोल्ड, स्पेस ग्रे, सिल्व्हर व रोझ गोल्ड रंगात सादर केले गेले आहेत. अमेरिकेत त्याच्या प्रीबुकींगची सुरवात १२ सप्टेंबरपासून होत आहे. भारतातील ग्राहकांना मात्र हे फोन खरेदी करण्यासाठी आणखी कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिक्स एस साठी १६ जीबीची किंमत ६४९, ३२ जीबीची किंमत ७४९ तर ६४ जीबीची किंमत ८४९ डॉलर्स आहे. तर सिक्स एस प्लससाठी याच किंमती अनुक्रमे ७४९, ८४९ व ९४९ डॉलर्स अशा आहेत.

सिक्स एससाठी ४.७ इंची डिस्प्ले मजबूत ग्लास कर्व्हसह दिला गेला आहे. १२ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून यावर चार हजार व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत. ६३ एमपीचे पॅनोरमा पिक्चरही हा कॅमेरा घेऊ शकेल. ए ९ प्रोसेसरसह थ्रीडी टच व मल्टी टच सुविधा त्याला दिली गेली आहे. हा फोन आत्तापर्यंतच्या फोनमध्ये वेगवान आहे.

आयफोन सिक्स एस प्लससाठी ५.५ इंची स्क्रीन थ्रीडी व मल्टीटच सुविधेसह दिला गेला आहे. आयपॅड प्रो ला १२.९ इंची मल्टीटच स्क्रीन दिला गेला आहे. या इव्हेंटमध्ये टीव्हीओएस ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमही लाँच केली गेली आहे.

Leave a Comment