तीन देशांच्या सीमा जोडणारा नद्यांचा संगम

argemtina
अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वे या तीन देशांच्या सीमा ज्या एका पॉईंटवर मिळतात तो अतिशय अभूतपूर्व आहे आणि म्हणूनच जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या स्थळाला भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. हा पॉईंट म्हणजे पराना आणि इग्वाजू नद्यांचा संगम आहे. येथून निसर्गाचा अतिशय नयनरम्य देखावाही पाहता येतो आणि एकाचवेळी तीन देशांच्या सीमा पाहण्याची संधीही मिळते.

या संगमावर एक आंतरराष्ट्रीय पूलही आहे. हा पूल अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन देशांना जोडतो. या तीन देशांच्या सीमांचे मिलन कुठल्याही देशातून पाहता येत असले तरी पर्यटक मात्र त्यासाठी अर्जेंटिनाला अधिक प्राधान्य देतात. येथे १९०३ साली अर्जेटिनाने एक पिरॅमिड बांधला आहे. अर्थात तिन्ही देशांनी त्यांच्या भागात मनोरे उभे केले आहेत आणि त्याला आपापल्या देशांचा राष्ट्रीय रंगही दिला आहे. हा संपूर्ण मार्गच अतिशय देखणा आणि आवर्जून भेट द्यावा असा आहे.

Leave a Comment