सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ

government
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्राच्या एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या निर्णयामुळे याचा फायदा होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ११३ टक्के महागाई भत्ता मिळत होता, तो आता ११९ टक्के होईल. १ जुलैपासूनच्या वेतनामध्ये वाढीव भत्ता लागू होणार आहे. सरकारने यापूर्वी एप्रिल महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती.

Leave a Comment