डॉलर तुलनेत रूपया मजबूत होण्यासाठी हनुमानाला साकडे

hanuman
बडोद्यातील कष्टभंजन हनुमान मंदिरात गेलात तर भिंतीवर चिकटविलेल्या हजार व पाचशेच्या नोटा तुम्हाला कदाचित चकीत करतील. पण डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरण रोखण्यासाठी गुजराथी भाईंनी केलेला हा अनोखा उपाय आहे. या नोटांचे मूल्य ७ लाखांपेक्षा अधिक झाले आहे .

जागतिक मंदीची टांगती तलवार, तसेच चीनने त्यांच्या चलनाचे केलेले अवमूल्यन याचा थेट परिणाम रूपयाच्या किमतीवर होत असून दिवसेनदिवस रूपया डॉलरच्या तुलनेत घरसत चालला आहे. रूपयाची ही घसरण थांबविण्यासाठी केले जात असलेले आर्थिक उपाय पुरेसे किंवा अपयशी ठरत असल्याने गुजराथेतील नागरिकांनी बडोद्याच्या हनुमानाला साकडे घालून ही घसरण थांबव असे आर्जव केले आहे. रूपयाच घरसल्याचा थेट परिणाम परदेशात व्यापार करणार्‍या व्यावसायिकांवर होत आहे. त्यामुळे अखेर भगवानाला शरण जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही अशी या भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिर ट्रस्टचे पुजारी म्हणाले गेली तीन वर्षे या हनुमानाची रूपयाची घसरण बंद व्हावी यासाठी विशेष पूजा केली जात आहे. यंदा मंदिराच्या भिंतींवर हजार व पाचशेच्या नोटा चिकटविल्या गेल्या आहेत. मंदिर ट्रस्टचे सचिव अमीन म्हणाले, रोज हजारो लोक या मारूतीच्या दर्शनासाठी येत आहेत मात्र एकही नोट चोरीला गेलेली नाही. या नोटा चिकटविणार्‍या दानदात्यांची नांवे नोंदविली गेली आहेत. नवस पुरा झाला की त्यांच्या नोटा त्यांना परत दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment