व्हेस्पाच्या १५० सीसीच्या एसएक्सएल व व्हीएक्सएल सादर

vespa
व्हेस्पाने त्याच्या एसएक्सएल १५० व व्हीएक्सएल १५० अशा दोन नव्या स्कूटर्स लाँच केल्या असून स्कूटर बाजारात १५० सीसीच्या या पहिल्याच स्कूटर्स आहेत. जागतिक ब्रँड अँबेसिडर एलेजेंद्रो पियरोच्या उपस्थितीत त्या सादर केल्या गेल्या. एसएक्सएलची किंमत ८४४६१ रूपये तर व्हीएक्सएलची किंमत ८८६९६ रूपये (एक्स पुणे शो रूम) आहेत. स्कूटर बाजारात या स्कूटर्स सर्वाधिक महाग आहेत.

या दोन्ही मॉडेल्ससाठी नवीन इंजिन दिली गेली आहेत. गाडीचे वजन कमी करण्यासाठी इंजिनात अॅल्युमिनियम सिलेंडरचा वापर केला गेला आहे. सीव्हीटी गिअरबॉकस दिला गेला आहे.एसएक्सएलसाठी राऊंड हेडलँप दिला गेला आहे. या दोन्ही स्कूटर दिसायला एलिट क्लासच्या आहेत. सेमी डिजिटल क्लॉकस, फूयएल गेजसाठी डिजिटल डिस्प्ले, ओडोमीटर, रिझर्व्ह इंडिकेटर, अॅलाय व्हील्स, क्रोम बंपर्स अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. दोन्ही गाड्यांसाठी मोनोकॉल स्टील बॉडी दिली गेली आहे. भारतात कोणतीही स्कूटर स्टील बॉडीची नाही.

दोन्ही गाड्यांसाठी मॅक्सिस ट्यूबलेस टायर्स आहेत त्यामुळे रायडरला बाईकचे अपील मिळते असे कंपनीचे म्हणणे आहे. भारतात ऑटो स्कूटर बाजारात ११० व १२५ सीसीच्याच स्कूटर्स उपलब्ध असून ग्राहकांना आता १५० सीसीचा चॉईसही उपलब्ध झाला आहे.