मायक्रोमॅक्सची उपकंपनी असलेल्या यू टेलिव्हेंचर्सने देशातील पहिला सर्वात स्वस्त फोर जी स्मार्टफोन यु युनिक नावाने बाजारात आणला आहे. या फोनची किंमत ४९९९ रूपये असून तो स्नॅपडीलवर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे.
यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फोर जी यु युनिक फोन
या स्मार्टफोनसाठी ड्युअल सिम, अँड्राईड ५.१ ओएस, ४.७ इंची एचडी डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. १ जीबी रॅम, अॅड्रेनी ३०६ सह ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ८ एमपीचा मेगा ऑटोफोकस रियर कॅमेरा, २ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कॅमेर्यात जियो टॅगिंग, फेस डिटेक्शन, एचडीआर, पॅनोरमा मोड, लाईव्ह फिल्टर्स ही फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, वायफाय, जीपीएस, एजीपीएस, एज, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन्स आहेत. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या फोरजी फोनमध्ये हा सर्वात स्वस्त आहे.