हजाराच्या नोटेच्या छपाईसाठी ३ रूपये खर्च

notes
रिझर्व्ह बँकेकडून हजारांच्या नोटांसाठी नवीन सिक्युरिटी मेजर्स नक्की केली जात असताना आणि या नोटांच्या बनावट नोटा करणे जादा अवघड बनले असताना या नोटा छापण्यासाठी प्रत्येक नोटेमागे किती खर्च येणार याचे कुतुहल आता शमले आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक हजाराच्या नोटेच्या छपाईसाठी फक्त ३ रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन सर्व नोटांसाठी यापुढे स्वदेशी कागद आणि शाई वापरली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमि. मध्ये छापल्या जाणार्‍या १ हजाराच्या प्रत्येक नोटेसाठी २.६७ पैसे तर सिक्युरिटी प्रिटींग अॅन्ड मिटींग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये छापलेल्या नोटांसाठी प्रत्येकी ३.१७ पैसे इतका खर्च येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जाणार्‍या ५०० रूपयांच्या नोटांसाठी २.४५, १०० रू नोटेसाठी १.२०, ५० च्या नोटेसाठी १.६३,२० रूपयांच्या नोटेसाठी ९४ पैसे तर १० रूपयांच्या नोटेसाठी ६६ पैसे असा आहे.

सिक्यरिटी प्रेसकडून छापल्या जाणार्‍या नोटांमध्ये ५०० रूपयाच्या नोटेसाठी २.५३, १०० च्या नोटेसाठी १.४०, ५० च्या नोटेसाठी ९४ पैसे, २० च्या नोटेसाठी १.१६ तर १० रूपयांच्या नोटेसाठी ९४ पैसे असा आहे.

Leave a Comment