जीपची एसयूव्ही रेनगेड चार व्हेरिएंटमध्ये सादर

jeep
अमेरिकन कंपनी जीप ने त्यांची एसयूव्ही रेनेगेड चार व्हेरिएंटमध्ये सादर केली असून ही एसयूंव्ही दमदार, जबरदस्त लूकची आहे. दोन इंजिन ऑप्शन मध्ये ही चार व्हेरिएंट सादर केली गेली आहेत. स्टाईल पूर्वीच्या जीप मॉडेल्सप्रमाणेच वाटली तरी नवीन टचमुळे या एसयूव्हीच्या लूकमध्ये कमाल झाली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तिला १.४ लिटरचे आयफोर मल्टी एअर टर्बो स्पोर्ट आणि लॅटिट्यूट व्हेरिएंटसाठी तर २.४ लिटरचे आयफोर इंजिन ट्रायलहॉक व लिमिटेड या व्हेरिएंटसाठी दिले गेले आहे.

टेरेन कंट्रोलमुळे या गाड्या कोणत्याही रस्त्यावर आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील असा कंपनीचा दावा आहे. सेव्हन स्लॉट ग्रील व राऊंड हेडलाईट मुळे गाड्यांना अनोखा लुक आला आहे. याचे छत सहज उघडता येते व कोवळी उन्हे अथवा ताज्या हवेचा प्रवाशांना आनंद लुटता येतो. टेल लँपचे डिझाईनही आकर्षक केले गेले आहे. सिल्व्हर पेंटेंड ग्रिल प्रिमियम फिचर्सपैकी एक आहेत. डिस्क ब्रेक्स मुळे ही एसयुव्ही चालविणे अतिशय सुरक्षित आहे. गाडीची दोन्ही पॅनल्स खोलता येतात. या चारही व्हेरिएंटसाठी प्रत्येकीची कांही खास वैशिष्ठ्येही आहेत. या गाड्या पहाडी भागात, बर्फात कुठेही सुरक्षित प्रवासाची हमी देतात.

१.४ लिटर इंजिनसाठी सहा स्पीड सी ६३५ मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. स्पोर्ट व्हेरिएंटची किंमत १२ लाख तर लॅटिट्यूडची किंमत १५ लाख रूपये आहे. २.४ लिटर इंजिनसाठी नाईन स्पीड ९४८ टीई अॅटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. याच्या ट्रायलहॉक मॉडेलची किंमत १७ लाख तर लिमिटेड मॉडेलची किंमत १८ लाख रूपये आहेत. भारतात या गाड्या अजून आलेल्या नाहीत मात्र त्या १५ ते २० लाखांच्या दरम्यान असतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment