मुंबई : आपला नवा स्मार्टफोन एचटीसी या कंपनीने बाजारात आणला असून या फोनचे नाव एचटीसी डिझायर ७२८ असे आहे. हा फोन पांढरा, सोनेरी (गोल्ड), काळा आणि करडा (ग्रे) या रंगात उपलब्ध आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असून, लवकरच भारतात येणार आहे.
एचटीसीने लॉन्च केला डिझायर ७२८
कसा आहे एचटीसी डिझायर
या फोनमध्ये २ जीबीचे रॅम, १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली असून त्याची क्षमता मायक्रो एसडी कार्डने वाढवू शकता. या फोनचा प्रोसेसर १.३ GHZ मीडियाटेक चिपसेटचा असून ऑपरेटिंग सिस्टम ५.१.१ लॉलीपॉपचे आहे. स्क्रीन ५.५ इंचाची असून त्याचे रेझ्युलेशन ७२०x१२८० एवढे आहे. त्याचबरोबर यात डॉल्बी साऊंड फीचर दिले आहेत. या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.