इस्लामपूर झाले देशातील पहिले ४जी वायफाय शहर

jayant-patil
सांगली- भारतातील पहिले मोफत ४जी वायफाय सुविधा देणारे शहर म्हणून आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे ओळखले जाणार आहे. रिलायन्स जीओ यांच्यामार्फत नगरपरिषदेच्या हद्दीत मोफत ४जी वायफाय सुविधा आमदार व माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी उपलब्ध केली आहे.

या मोफत वायफाय सुविधेचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भाटकर यांनी दोन वर्षांपूर्वी इस्लामपुरातील शैक्षणिक सुविधा बघून शहरात वायफाय सेवा सुरु करण्याची कल्पना मांडली होती.

Leave a Comment