सर्वांत दूरची आकाशगंगा सापडल्याचा संशोधकांनी केला दावा

galaxy
वॉशिंग्टन : तब्बल १३.२ अब्ज वर्षांच्या आकाशगंगेचा शोध लावल्याचा दावा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (कॅलटेक) संशोधकांनी केला असून, ती आतापर्यंत दिसलेली सर्वांत दूरची आकाशगंगा असण्याची शक्यता आहे. बहुतांश तज्ज्ञांच्या मान्यतेनुसार, विश्वाची उत्पत्ती १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाल्यामुळे १३.२ अब्ज वर्षे वय असलेली ही आकाशगंगा सर्वांत मोठी आणि दूरची असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला दिसलेल्या या आकाशगंगेचे नाव ईजीएस८पी७ असे ठेवण्यात आले आहे. ही आकाशगंगा इतर आकाशगंगांच्या तुलनेत अत्यंत प्रकाशित असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तप्त ता-यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे, असे सिरीओ बेली या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या संशोधकाने सांगितले आहे. या आकाशगंगेच्या विशेष वैशिष्ट्यामुळे यामध्ये इतरांच्या मानाने फार लवकर हायड्रोजन तयार झाला असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गृहितकानुसार, महास्फोटानंतर लगेचच विविध भारीत कण आणि फोटॉन्स यापासून विश्वाची निर्मिती सुरू झाली.

Leave a Comment