इस्त्रायलमध्ये श्रीकृष्ण जन्मसोहळा धामधुमीत साजरा

esreal
इस्त्रायलच्या किबूत्स बरकाई या छोट्याश्या शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा प्रंचड मोठ्या प्रमाणावर आणि धामधुमीत साजरा केला गेला असल्याचे समजते. या छोट्याशा गावात या उत्सवासाठी देशभरातून शेकडो भाविक हजर झाले होते आणि अवघे वातारवण हरे कृष्णाच्या गजराने दुमदुमले होते. भाविकांत ज्यू लोकांची संख्या मोठी होती.

या छोट्याशा गावात शेतीवर आपली गुजराण करणार्‍या अनेक वस्त्या आहेत. हे गाव कृष्णभक्त नगरी म्हणूनच ओळखले जाते. भारतात वृंदावन मायापूर येथील यात्रा पाहिलेले अनेक ज्यू या गावात स्थायिक झाले आहेत. जन्माष्टमीच्या सोहळ्यात भारतात मथुरा, वृंदावन येथे जसा सोहळा होतो त्याचप्रमाणे हे मूळ भारतातले ज्यू इस्त्रायलाच्या या गावातही सोहळा साजरा करतात आणि आता हा सोहळा अन्य लोकांनाही आकर्षित करतो आहे.

या सोहळ्यात कृष्णाच्या बालपणावर आधारित नाटिका सादर केली गेली तसेच रात्री उशीरापर्यंत तबला, ढोलांचा साथीवर भजनेही म्हटली जात होती. पेटी, बासरी आणि नृत्यांचीही धमाल होती. हा सोहळा जेव्हापासून सुरू झाला त्यात यंदा सर्वाधिक भाविकांनी येथे हजेरी लावली होती आणि आलेल्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून बनविल्या गेलेल्या १०८ शाकाहारी पदार्थांचे वाटप करण्यात आले असेही समजते.

Leave a Comment