झिंक टेक्नॉलॉजीसह पोलोराईड प्लस कॅमेरा सादर

camera
बर्लीन येथे सुरू असलेल्या आयएफए परिषदेत पोलोराईडने पोलोराईड प्लस नावाने एक कॅमेरा सादर केला असून त्यात झिंक टेक्नॉलॉजी कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.यामुळे हा कॅमेरा फोटो काढेल, त्याच्या प्रिंटही काढेल पण त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हे फोटो प्रिंट करण्यासाठी इंकची गरज लागणार नाही. कंपनीने विकसित केलेल्या झिरो इंक टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य होणार आहे.

हा कॅमेरा स्नॅप पद्धतीचाच आहे पण त्यात काळा, पिवळा व मजेंटा डाय क्रिस्टलचा वापर केला गेला आहे. त्याच्यासाहाय्याने विशेष प्रकारच्या कागदावर फोटो प्रिटींग करता येते. फोटो काढलो की पोलोराईड प्रिंटर हे क्रिस्टल अॅक्टीव्हेट करतो त्यातून २ बाय ३ साईजचे कलर फोटो प्रिंट करून मिळतात. कॅमेर्‍यासाठी २ बाय ३ आकाराच्या ५० पेपरचा सेट उपलब्ध करून दिला गेला आहे.

या कॅमेर्‍यातून १० मेगापिक्सलचे मोठे फोटोही काढता येणार आहेत. त्यासाठी ३२ जीबीचे मेमरी कार्ड लावण्याची सुविधा केली गेली आहे. त्याच्या सहाय्याने मोठे फोटो प्रिंट करणेही शक्य होणार आहे. १० सेकंदात सहा फोटो क्लिक करण्याची कॅमेर्‍याची क्षमता आहे. त्याला सेल्फ टायमरही दिला गेला आहे. काळा, पांढरा, लाल व निळ्या रंगात हा कॅमेरा उपलब्ध होणार असून त्याची किंमत ९९ डॉलर्स व प्रिटींग पेपरची ५०च्या सेटची किंमत २४ डॉलर्स आहे. हा कॅमेरा आक्टोबर २०१५ मध्ये बाजारात दाखल होईल.

Leave a Comment