लेनोव्होचा पहिला ड्युअल फ्रंट कॅमेरावाला वाईबे एस १

vibe
चीनी इलेक्टॉनिक कंपनी लेनोवो ने पहिला डयुअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन बर्लीन येथे सुरू असलेल्या आयएफए २०१५ मध्ये सादर केला असून त्याचे नामकरण वाईबे एस १ असे केले गेले आहे. या फोनच्या फ्रंट पॅनलवर ८ व २ एमपीचे दोन कॅमेरे दिले गेले आहेत. यातील ८ एमपीचा कॅमेरा फोटो काढण्यासाठी तर २ एमपीचा कॅमेरा फोटोला डेप्थ देण्यासाठी वापरला जाईल. यामुळे फोटोची क्लालिटी उत्तम राहणार असून सेल्फीसाठी हा अत्यंत आनंददायक अनुभव असेल असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये फोटो एडीट करण्यासाठी आवश्यक त्या सार्‍या सुविधाही दिल्या गेल्या आहेत. ड्युअल फ्रंट कॅमेरा हे फिचर प्रथमच स्मार्टफोनमध्ये दिले गेले आहे.

या फोनला ५ इंची फुल एचडी स्क्रीन, अँड्राईड लॉलीपॉप ५.० ओएस, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा असे फिचर्स आहेत. त्याचबरोबर १३ एमपीचा ड्युअल फ्लॅश कॅमेराही दिला गेला आहे. मेटल बॉडीचा हा फोन फोर जी ला सपोर्ट करणारा आहे. पांढरा व निळा अशा दोन रंगात तो येईल. याची किंमत अंदाजे १९५०० च्या दरम्यान असेल आणि तो नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल होईल असेही समजते. बर्लिनमधील इव्हेंटमध्ये वाईबे एस, पी१ व पी१एम असे आणखी तीन स्मार्टफोनही सादर केले गेले आहेत.

Leave a Comment