दोन देशांना जोडणारा अनोखा समुद्र पूल

swiden
डेन्मार्क आणि स्वीडन या दोन देशांना जोडणारा कनेक्टींग ब्रिज इंजिनिअरिंगचा एक अजोड ननुना म्हणून जगात प्रसिद्ध आहे. ओरसंग नावाचा हा ब्रिज डेन्मार्कच्या कोपनहेगन ते स्वीडनमधील मालमो या दोन शहरांना जोडतो. सुमारे ८ किमी लांबीचा हा ऐन समुद्रातला ब्रिज डबल ट्रॅक ब्रिज आहे. म्हणजे येथे एक लेन ट्रेनसाठी तर दुसरी वाहनांसाठी आहे.

इंजिनिअरींग कौशल्याचा नमुना म्हणून या ब्रिजकडे पाहिले जाते. याचे आणखी एक कारण म्हणजे जहाजांची वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून समुद्राखालून चार किमी लांबीचा बोगदाही काढला गेला आहे. त्याला ड्रागडेन टनेल असे म्हटले जाते. तसेच त्यातून एक डेटा केबलही टाकली गेली आहे. त्यातून फिनलंडला इंटरनेट डेटा ट्रान्समिट केला जातो. १९९५ साली या ब्रिजचे काम सुरू झाले ते १९९९ मध्ये पूर्ण केले गेले. त्यानंतर पूर्ण क्षमतेने हा ब्रिज २००० सालापासून वापरात आणला गेला. या ब्रिजवरून दररोज १७ हजारांहून अधिक गाड्या जातात. पुलाच्या बांधकामासाठी ३७ हजार कोटींचा खर्च केला गेला आहे.

Leave a Comment