मेड इन इंडिया अंतर्गत सोनीचे एक्सपिरीया फोन तयार होणार

sony
सोनी कॉर्पने टिव्हीचे भारतात उत्पादन सुरू केल्यानंतर आता त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन एक्सपिरीया याची असेंब्ली आणि १० हजार रूपये किमतीच्या दरम्यान असलेले दोन स्मार्टफोन उत्पादन भारतात सुरू करण्याच्या दृष्टीने पावले टाकली असल्याचे समजते. भारतात उत्पादित होणारे दोन नवे फोन स्थानिक बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन केले गेले असल्याचेही सांगितले जात आहे.

एक्सपिरीयाची असेब्ली करताना तैवानची टॉपवर असलेली कॉन्टॅक्ट कंपनी फॉक्सकॉन बरोबर चर्चा सुरू असल्याचे सोनी इंडियाचे प्रवक्ते म्हणाले. या फोन्सची पहिली बॅच या वर्षातच तयार होणार असल्याचेही समजते. अमेरिका. चीन व जपान पाठोपाठ सोनीसाठी भारत हा चौथ्या क्रमांकाचा बाजार आहे. मोबाईल विक्रीतून कंपनी महसूलात वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. २०१७ पर्यंत भारत जगातील दोन नंबरचे स्मार्टफोन मार्केट असेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मेक इन इंडिया योजनेमुळे सोनीला ६ ते साडेसहा टक्के ड्यूटी कमी बसणार असून त्याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे.

गेल्या महिन्यापासूनच सोनीने त्यांच्या ब्राव्हिया टिव्हीचे उत्पादन चेन्नई येथील फॉक्सकॉनच्या प्रकल्पात सुरू केले आहे. फॉक्सकॉन चीनमध्ये जागतिक पुरवठ्यासाठी सध्या सोनीचे स्मार्टफोन बनवत आहे.

Leave a Comment