फोरजॉय फ्युचर स्मार्ट कार

fourjoy
स्मार्टफोन ने अवघे जग व्यापले असतानाच आता स्मार्ट कारचे दिवसही येऊ घातले आहेत.फोरजॉय ही दारे खिडक्या नसलेली स्मार्टकार लवकरच लाँच केली जात असल्याची चर्चा जोरात सुरू झाली असून वास्तविक ही कार २०१४ अखेरीच लाँच केली जाणार होती.

फोरजॉय स्मार्टकारला दारे खिडक्या नाहीत तसेच कारचे छतही उघडेच आहे. मागची सीट लाऊंजमधील फर्निचर प्रमाणे दिसते आहे. मात्र या कारमध्ये चार जणांसाठी पुरेशी जागा आहे. कारचे थ्री डायमेंशन अपराईट फ्रंट खरोखरच शानदार लुक देते आहे. कारची चाके हा उत्तम इंजिनिअरिंगचा नमुना म्हणता येतील. तसेच कारचे टेल लाईट ही फ्यूचर कार आहे याचा पुरावा देत आहेत.

कारसाठी इलेक्ट्रीक ड्राईव्ह सिस्टम असून हेडलँपवरही ग्लास कव्हर दिले गेलेले नाही. या कारची किंमत किती असेल आणि ती नक्की केव्हा बाजारात येईल याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.