उबेर चालकाने विदेशी तरूणीची केली छेडछाड

ola
जयपूर- दिल्लीत विदेशी महिलेवर उबेर टॅक्सी चालकाने बलात्कार केल्याची केस न्यायालयात सुरूच असताना जयपूर येथेही एका विदेशी महिलेशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न उबेरच्याच टॅक्सीचालकाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिला फिनलंडची असून ती जयपूर येथे खासगी कंपनीत काम करते. तिने या प्रकाराबद्दल पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही युवती उबेर टॅक्सीमधून जात असताना चालकाने तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. युवतीला त्याला विरोध करताच त्याने तिला धमकावले मात्र तरीही न घाबरता या युवतील कॅब थांबविणे भाग पाडले आणि रस्त्यातच उतरून तडक पोलिस चौकी गाठली व झाल्याप्रकाराबद्दल तक्रार नोंदविली. टॅक्सीचालक सुरदीप हा मूळचा बिहारचा राहणारा असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.