भारतीय बनावटीच्या दागिन्यांची पाकिस्तानात क्रेझ

outhouse
भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत आपसातील राजकीय संबंध कसेही असले तरी त्याचा परिणाम भारतीय उत्पादनांवर फारसा होताना दिसत नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात मिळत असलेली लोकप्रियता आहेच पण त्याचबरोबर भारतीय बनावटीचे दागिनेही पाकिस्तानी लोकांना भुरळ घालत आहेत.

आऊट हाऊस आणि प्रेर्टो या सारख्या बड्या ब्रँडेड दागिने कंपन्यांना पाकिस्तानाच खूपच लोकप्रियता आणि लोकाश्रय मिळताना दिसत आहे. कांही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या या ब्रँडनी पाकिस्तानात विक्रीचे रेकॉर्ड केले आहे. फातिमा अहमद सांगतात, फॅशनचा विचार केला तर भारतीय आणि पाकिस्तान्यांची आवड जवळजवळ समान आहे. त्यात बॉलीवूडची क्रेझ खूप आहे आणि त्यातील नट्या परिधान करत असलेले दागिने पाकिस्तानातही लोकप्रिय होतात. आऊट हाऊस व प्रेर्टो सारख्या ब्रँडचे दागिने ४ हजारांपासून ३० हजारांच्या दरम्यान आहेत त्यामुळे ते सहज परवडणारे आहेत. यांचा खप इतका प्रचंड आहे की नवीन माल आला की कांही दिवसांतच तो संपतो त्यामुळे या दागिन्यांचा पुरवठा वाढविणे भाग पडते आहे.

Leave a Comment