छत्तीसगडमध्ये असेही शिवलिंग आहे जे दरवर्षी वाढते

shivling
रायपूर – येथून ९० किमी अंतरावर असलेल्या गरियाबंद जिल्ह्यात मरौदा नामक गावाजवळच्या जंगलात एक स्वयंभू शिवलिंग आहे. ‘भुतेश्‍वर महादेव’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या शिवलिंगाची ख्याती सर्वत्र आहे. दरवर्षी याची उंची वाढत असल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. अर्धनारीनटेश्‍वर या शिवलिंगाला ‘भकुर्रा महादेव’ असेही भाविक संबोधतात.

परिसरातील स्थानीय पंडित व मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य सांगतात की, दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवलिंगाची उंची व गोलाई मोजली जाते तेव्हा ते एक ते पाऊण इंच वाढल्याचेच निदर्शनास येते. एवढेच नाही तर प्राचीन काळी परिसरातील जमीनदार हत्तीवर बसून या महादेवाला अभिषेक करीत असल्याचे सांगण्यात येते.

मंदिरातील पूजारी केशव सोम यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी श्रावण महिन्यात भुतेश्‍वर महादेवाच्या पूजा-अर्चनेसाठी असंख्य भाविक येतात. या भाविकांच्या साक्षीने या शिवलिंगाची उंची मोजली जाते. २५ वर्षांपासून भुतेश्‍वर महादेव मंदिराच्या व्यवस्थापन समितीशी संबंधित मनोहरलाल देवांगण यांनी माहिती दिली की, १७ गावांची मिळून संचालन समिती गठित करण्यात आली असून, ती येथील सेवाकार्य पार पाडते. जगातील हे एकमेव असे शिवलिंग आहे की ज्याची दरवर्षी उंची वाढते.

Leave a Comment